प्रतापगड, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या एका रस्ते अपघातात मोठी जीवितहानी झाल्याचं समोर येतंय. लखनऊ हायेवेवर अतिवेगामुळे अनियंत्रित झालेल्या बोलेरो गाडी एका उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकल्यानंतर हा अपघात झाला. एका लग्नसोहळ्यात सहभागी झाल्यानंतर १४ जणांना घेऊन घरी निघालेल्या १४ जणांचा या अपघातात चिरडून मृत्यू झाला. अपघातात प्राण गमावणाऱ्यांत पाच अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

प्रतापगडचे पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी या घटनेला दुजोरा दिलाय. चालकाला डुलकी लागल्यानं हा झाला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

मुख्यमंत्री यांनीही प्रतापगड रस्ते अपघातावर दु:ख व्यक्त केलंय. वरीष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहचण्याचे आणि पीडितांना मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

वाचा : वाचा :

प्राथमिक माहितीनुसार, प्रतापगड जिल्ह्यातील नबाबगंज भागात शेखापूरहून एका लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी झालेले सगळे लोक बोलेरोतून घरी परतत होते. गुरुवारी रात्री जवळपास १.०० वाजल्याच्या सुमारास लखनऊ – प्रयागराज हायवेवर अचानक चालकाचा बोलेरोवरचा ताबा सुटला आणि गाडी समोरच उभ्या असलेल्या ट्रकमध्ये जाऊन घुसली. या अपघातात बोलेरोतून प्रवास करणाऱ्या १४ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेले सर्व जण कुंडाच्या जिर्गापूरचे रहिवासी आहेत.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here