मुंबई : शेअर बाजारात सध्या निवडक शेअरची खरेदीचा ओघ सुरु आहे. आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात दोन्ही निर्देशाकांनी सकारात्मक सुरुवात केली आहे. कालच्या पडझडीतून सावरत सेन्सेक्स २७५ अंकांची झेप घेतली होती. सध्या तो ७३ अंकांनी घसरला असून ४३५२६ अंकांवर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा १७ अंकांनी घसरला असून १२७५४ अंकांवर आहे.

आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, रियल्टी कंपन्या या क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. मुंबई शेअर बाजाराचा मंचावर बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एनटीपीसी, टायटन, एलअँडटी, एसबीआय, इंडसइंड बँक, एचडीएफसी, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक या शेअरमध्ये वाढ झाली आहे. तर बजाज ऑटो, इन्फोसिस, टीसीएस, एचयूएल हे शेअर घसरले आहेत.

आज चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने दमदार कामगिरी केली आहे. सध्या रुपया १२ पैशाने वधारला असून तो ७४.१५ वर आहे. गुरुवारी देखील रुपयात १२ पैशांची वाढ झाली होती. तो ७४.२७ वर बंद झाला होता. शेअर बाजारातील तेजीने रुपयाला बळ मिळाल्याचे जाणकारांनी सांगितले.

स्थावर मालमत्ता क्षेत्रात फिनिक्स मिल, ओबेराय रियल्टी, गोदरेज प्रॉपर्टी, ब्रिगेड एंटरप्राइज, शोभा आदी शेअर तेजीत आहेत. त्याशिवाय व्होडाफोन, येस बँक, टाटा मोटर्स, स्पाईस जेट या शेअरमध्ये उलाढाल वाढली आहे. शेअर बाजाराच्या माहितीनुसार गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ११८० कोटींची गुंतवणूक केली. तर स्थानिक संस्थामक गुंतवणूकदारांनी २८५४ कोटींचे शेअर विक्री केले आहेत. काल बाजार बंद होताना सेन्सेक्स ५८० अंकांनी घसरला आणि ४३५९९ अंकांवर बंद झाला. निफ्टी १६६ अंकांच्या घसरणीसह १२७७१ अंकावर स्थिरावला.

आज आशियातील शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. अमेरिकेतील भांडवली बाजार गुरुवारी तेजीसह बंद झाले. डाऊजोन्स, एस अँड पी आणि नॅसडॅक या शेअर निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे आज आशियातील शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. दरम्यान अमेरिकेत बेरोजगार भत्ता घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ७४२००० पर्यंत गेली असल्याचे तेथील श्रम खात्याने म्हटलं आहे.तसेच मागील काही दिवसात अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या देखील वाढली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here