मुंबई: राजकीयदृष्ट्या निष्प्रभ झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्या जोमानं मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. येत्या २३ जानेवारी रोजी मुंबईतील गोरेगावमध्ये होणाऱ्या मनसेचा मेळावा त्या दृष्टीनं निर्णायक ठरणार असून या मेळाव्याच्या वातावरणनिर्मितीसाठी मनसेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नेते यांचं ‘अळूचं फदफदं आणि मिरचीच्या ठेच्याचं’ आजचं ट्विट त्यामुळंच चर्चेचा विषय ठरलं आहे.

भाजपची साथ सोडून शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीची हात धरल्यानं राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. राजकीय अपरिहार्यता बघता आता शिवसेनेला हिंदुत्व व मराठीची भूमिका जोरकसपणे मांडता येणार नाही. त्याचाच फायदा उचलून पक्षाला उभारी देण्याचा यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. मनसेच्या झेंड्याच्या रंगातही बदल करण्याचं घाटत आहे. राज ठाकरे हे भाजपला सोयीस्कर अशी हिंदुत्वाची भूमिका घेणार का, असाही प्रश्न विचारला जात आहे. मनसेच्या मेळाव्यात याची उत्तरं मिळणार आहेत. मात्र, त्याच दिवशी शिवसेनेनंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जंगी सत्काराचं आयोजन केलं आहे. त्यातूनच मनसेनं आपल्या मेळाव्याकडं लक्ष वेधण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू केले आहेत.

वाचा:

वाचा:

मनसेचे संदीप देशपांडे यांनी आज एक ट्विट केलं आहे. ‘मंत्रालयातील गोड गोड अळूचं फदफदं आवडतं की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी निर्णय तुमचा… ।। मराठा तितुका मेळावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राज ठाकरे यांचं भाषण जोरदार होणार याचे संकेत त्यांनी दिलेच आहेत. शिवाय, ‘मंत्रालयातील फदफदं’ असं म्हणत शिवसेनेलाही जोरदार टोला हाणला आहे. मनसेला त्यांनी मिरचीच्या झणझणीत ठेच्याची उपमा दिली आहे. या दोन्हींपैकी काय हवं याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here