मुंबई: राज्यातील विरोधी पक्षनेते यांच्या पत्नी विविध विषयांवरील खोचक व टीकात्मक ट्वीटमुळं सतत चर्चेत असतात. अलीकडं एका गाण्यामुळं त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या गायनावर अनेकांनी टीकाही केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील महिला व बालविकास मंत्री यांनी मात्र अमृता यांनी गायलेल्या गाण्याचं कौतुक केलं आहे. ( praises for a song)

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना अमृता या गायिका म्हणून पुढे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी काही गाणीही गायली होती. अलीकडंच भाऊबीजेच्या मुहूर्तावर त्यांचं एक गाणं यू ट्यूबवर रिलीज झालं आहे. ‘बेटी बचाव’चा संदेश देणाऱ्या या गाण्याचा मुखडा ‘तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या,’ असा आहे. अमृता फडणवीस यांचं हे गाणं संगीतप्रेमींना फारसं आवडलेलं नाही. या गाण्याला मोठ्या प्रमाणावर डिसलाइक्स मिळाले आहेत.

वाचा:

प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी अमृता यांच्या गायनाची जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘गायी-म्हशींच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका ‘मी पुन्हा गाईन, मी पुन्हा गाईन’ म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही,’ अशी बोचरी टीका टिळेकर यांनी केली होती.

अमृता यांच्यावर अशी टीका होत असतानाच यशोमती ठाकूर यांनी अमृता यांनी गायलेल्या गाण्याचं कौतुक केलं आहे. ठाकूर यांनी गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. माझ्या शुभेच्छा!!!,’ असं ठाकूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मात्र, अमृता यांच्या गायनाबद्दल त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here