मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिशन मुंबई’चा नारा दिल्यापासून शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटलं आहे. ‘तुमच्या १०० पिढ्या उतरल्या तरी मुंबई महापालिकेवरचा भगवा खाली उतरवू शकणार नाहीत असं म्हणणारे खासदार यांना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ()

मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत केलं होतं. संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर हल्लाबोल केला होता. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा शुद्ध की भाजपचा हे मुंबईची जनताच ठरवेल. भाजप मुंबईला दिल्लीचं पायपुसणं करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचा डोळा इथला शेअर बाजार आणि जमिनींवर आहे. भगव्याला हात लावणारे खाक होतील,’ असं राऊत म्हणाले होते.

वाचा:

राऊत यांच्या या टीकेनंतर भाजपचे नेतेही सरसावले आहेत. आमदार भातखळकर व यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘मुंबई महापालिकेवरून भगवा उतरणार नाही या ‘सामना’तल्या भावनेशी सहमत आहे. फरक एवढाच की यावेळी भाजपचा भगवा फडकेल. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर मिरवलेले ‘हिंदुहृदयसम्राट’ हे बिरुद सत्तेच्या सोयीसाठी नाकारणाऱ्या शिवसेनेला जनता पाताळात गाडेल. २०२२ पासून त्याची सुरुवात होईल,’ असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

भगवा तर तुम्हीच उतरवलात!

आशिष शेलार यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. ‘१०५ हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला, कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली, याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला, ज्यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला त्यांच्या सोबत सत्तेत बसलात… तेव्हाच ‘भगव्याचा’ रंग तुम्ही फिका केलात. भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात,’ असा सणसणीत टोला शेलार यांनी हाणला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here