एका ट्विटमध्ये गहलोत लिहितात, ‘लव्ह जिहाद हा भाजपकडून देशाला विभाजित करण्यासाठी, तसेच धार्मिक सौहार्द बिघडविण्यासाठी तयार करण्यात आलेला शब्द आहे. विवाह हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. त्यावर अंकुश लावण्यासाठी कायदा आणणे हे पूर्णपणे घटनाविरोधी आहे. हा कायदा कोणत्याही न्यायालयात टिकणार नाही. प्रेमात जिहादला कोणतेही स्थान नाही.’
आणखी एका ट्विटमध्ये गहलोत लिहितात, ‘ते देशात असे वातावरण तयार करीत आहेत, जेथे प्रौढांना सहमतीसाठी राज्याच्या सत्तेच्या दयेवर अवलंबून राहावे लागेल. विवाह हा एक वैयक्तिक निर्णय आहे आणि ते यावर अंकुश ठेवत आहेत, वैयक्तिक स्वातंत्र्य हिसकावण्यासारखे आहे.’
गहलोत यांनी या मुद्द्यावर तिसरे ट्विट केले आहे. हा निर्णय धार्मिक सद्भावाला बाधित करणारा आणि सामाजिक संघर्ष वाढवणारा, तसेच घटनात्मक तरतुदींची अवहेलना करणारा आहे. राज्य नागरिकांशी कोणत्याही आधारे भेदभाव करत नाही, असे गहलोत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
उत्तर प्रदेश सरकारने लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची घोषणा केली आहे. तसेच मध्य प्रदेश सरकार देखील असाच कायदा आणण्याची योजना आखत आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times