नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्य वडिलांचे आज हैदराबादमध्ये निधन झाले. पण सिराज सध्याच्या घडीला भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतरही सिराज भारतामध्ये येणार नसल्याचे समजते आहे. पण याबाबतची अधिकृत माहिती कोणीही दिलेली नाही.

सिराजचे वडिल मोहम्मद घौस यांचे आज हैदराबादमध्ये निधन झाले, ते ५३ वर्षांचे होते. मोहम्मद घौस यांना फुफ्फुसांचा आजार झाल्याचे म्हटले जात आहे. फुफ्फुसांच्या आजाराबरोबर त्यांचा लढा सुरु होता. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

सिराज हा आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघात होता. आयपीएल संपल्यावर भारतीय संघासह तो ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत सिराजला संधी देण्यात आली आहे. पण सध्याच्या घडीला सिराज हा १४ दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये आहे. त्यामुळे त्याला तिथून बाहेर पडता येणार नाही, असे म्हटले जात आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पोहोचल्यावर सर्व खेळाडूंची करोना चाचणी घेण्यात आली. सर्व खेळाडू करोना निगेटीव्ह असल्यामुळे त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. पण या क्वारंटाइनमध्ये खेळाडूंना सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी सराव करायला सुरुवात केली आहे.

आरसीबीच्या संघाने आज रात्री मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाल्याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यनातून दिली आहे. आरसीबीने ट्विट केल्यावर सर्वांना सिराजच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त समजले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here