वाचा:
दोन महिन्यांपूर्वी शेजारी असलेल्या पिरणवाडी येथे संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्यावरून मराठी व कन्नड भाषिकांत जोरात वाद झाला होता. यामध्ये तडजोड करत पोलिसांनी तो वाद मिटवला होता. आता प्राधिकरणावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. कर्नाटक सरकारने राज्यातील मराठा समाजासाठी मराठा विकास प्राधिकरणाची घोषणा केली होती. त्यासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली. १३ नोव्हेंबर रोजी केलेल्या या घोषणेनंतर त्याला कन्नड भाषिकांनी जोरदार विरोध केला. पाच डिसेंबर रोजी राज्य बंदची हाक दिली. यामुळे सरकारने तातडीने एक पाऊल मागे घेत प्राधिकरणाऐवजी मराठा समाज महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली.
वाचा:
महामंडळ स्थापन झाल्यानंतर राज्यातील मराठा भाषिकांनी आनंदोत्सव साजरा केला. काही ठिकाणी सरकारच्या अभिनंदनाचे फलक झळकले. बेळगावचे आमदार अभय पाटील यांच्या समर्थकांनी अनगोळ नाक्यावर काही फलक लावले. मात्र सायंकाळी या फलकाला कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. पिरणवाडी येथे पुतळ्यावरून झालेला वाद ताजा असताना पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे. बेळगावात मराठा भाषिकांवर अत्याचार करत कर्नाटक सरकार एकीकडे त्रास देत असताना कन्नड भाषिकही जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करत असल्याने मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times