वाचा:
समाधान शिंदे आत्महत्या प्रकरणी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व मयताचा भाऊ यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच याप्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याऐवजी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशा आशयाचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष बारसे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
वाचा:
बारसे म्हणाले, ‘समाधान शिंदे हा ट्रॅक्टर चालक एका कारखान्यात ऊस वाहतुकीचे काम करीत होता. ट्रॅक्टर चोरीला गेल्याच्या कारणावरून त्याला संबंधित कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. त्यानंतर समाधान शिंदे याचा मृतदेह हा कोपर्डी येथे लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने दोन दिवसापूर्वी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर आता पुन्हा मयताचा भाऊ व आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटलो. आज देखील चर्चा झाली असून ही घटना गंभीर असून सहकार्य करू, असे पोलीस अधीक्षक म्हणाले आहेत. मात्र घटनेला दहा दिवस होऊन देखील तसेच आरोपींवर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल असताना देखील मयताच्या कुटुंबाची त्या भागातील पोलीस उपअधीक्षक यांनी भेट घेतली नाही. आम्ही फोन केला तर कुटुबियांना ऑफीसला पाठवून द्या, असे सांगितले. याप्रकरणाची निपक्षपातीपणे व कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. मयत समाधान शिंदे हा काम करीत असलेला कारखान्याचे जे संचालक मंडळ आहे, ते मोठ्या राजकीय पुढाऱ्याचे असल्यामुळे तेथील स्थानिक पोलीस प्रशासन दबावाला बळी पडत आहे. हा नेता राष्ट्रवादीचा मोठा पदाधिकारी असल्यामुळे पोलीस प्रशासन पूर्णपणे दबावात काम करीत आहे,’ असा गंभीर आरोपही यावेळी बारसे यांनी केला.
‘शिंदे कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. वेळ पडल्यास नगरसोबतच महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करून न्याय मिळवून देऊ,’ असेही त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
कोपर्डी येथील समाधान शिंदे यांच्यावर ट्रॅक्टर चोरीचा खोटा संशय घेऊन त्याना मारहाण करण्यात आली. त्यानंतर समाधान शिंदे याचा मृतदेह एका लिंबाच्या झाडाला फासावर लटकवलेल्या अवस्थेत आढळला होता. याप्रकरणी बाळू शिंदे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी , धनंजय बबन गुंड व काका ज्ञानदेव सुद्रिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दहा नोव्हेंबरला ही घटना घडली आहे. ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times