नवी दिल्ली : कोविड ही एक महामारी आहे परंतु, यापूर्वीच आपाल समाज दोन महामारींना बळी पडलाय ते म्हणजे आणि … असं म्हणत माजी उपराष्ट्रपती यांनी देशातील वाढत्या धार्मिक कट्टरतेबद्दल चिंता व्यक्त केलीय.

आज देशा अशा ‘प्रकट आणि अप्रकट’ विचार आणि विचारधारांमुळे धोक्यात दिसतोय जे ‘आम्ही आणि ते’च्या काल्पनिक मुद्यांवरून देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. करोना संकटापूर्वी भारतीय समाजाला धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद या दोन करोनापेक्षाही गंभीर आजारांना बळी पडल्याचंही, हमिद अन्सारी यांनी म्हटलंय.

धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद या दोहींच्या तुलनेत ‘देशप्रेम’ ही अधिक सकारात्मक संकल्पना आहे कारण ही सैन्य आणि सांस्कृतिक रुपात संरक्षणात्मक आहे, असं म्हणत हमिद अन्सारी यांनी आपलं मत व्यक्त केलंय.

वाचा : वाचा :

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर याचं नवं पुस्तक ”च्या डिजिटल प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं हमिद अन्सारी बोलत होते.

चार वर्षांच्या अल्प कालावधीत भारतानं एक उदार राष्ट्रवादच्या पायाभूत दृष्टीकोनाकडून सांस्कृतिक राष्ट्रवादीच्या राजकीय गृहितकापर्यंत प्रवास केलाय आणि त्यानं सार्वजनिक क्षेत्रात मजबुतीनं ताबा मिळवलाय, असं म्हणत हमिद अन्सारी यांनी देशाच्या परिस्थितीवर भाष्य केलंय.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीदेखील उपस्थित नोंदविली. ‘१९४७ साली आमच्याकडे पाकिस्तानसोबत जाण्याची संधी होती, परंतु माझ्या वडिलांनी आणि इतरांनी हाच विचार केला की दोन राष्ट्रांचा सिद्धांत आमच्यासाठी योग्य नाही. सद्य सरकारला देशाला ज्या पद्धतीनं पाहण्याची इच्छा आहे तो कधीही मंजूर होणार नाही’ असंही त्यांनी म्हटलंय.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here