मुंबई: वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. इच्छा असूनही या प्रश्नाबद्दल मी बोलू शकत नाही असं वक्तव्य या संदर्भात जलसंपदा मंत्री () यांनी केलं आहे. त्यावरून या प्रकरणात नक्कीच काहीतरी गडबड आहे, अशी शंका माजी खासदार () यांनी व्यक्त केली आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जयंत पाटील यांनी काल पुण्यात आढावा बैठकीला हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वीज बिलांमधील (Inflated ) गोंधळावर भाष्य केलं. ‘विविध वर्गातील ग्राहकांकडे सध्या ६७ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळं वीज मंडळ संकटात आलं आहे. वीज पुरविणारी व्यवस्थाच भाजपच्या सत्तेच्या अडचणीत आली असून तिची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘विजेच्या थकबाकीची वसुली कशी करायची, नागरिकांना सवलती कशा व किती द्यायच्या, याकडे सरकार लक्ष देत आहे. आचारसंहिता असल्यानं माझी इच्छा असूनही मी यावर उत्तर देऊ शकत नाही,’ असंही ते म्हणाले होते.

वाचा:

जयंत पाटील यांच्या याच वक्तव्याचा संदर्भ देत नीलेश राणे यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. ‘जयंत पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री सुद्धा आचारसंहितेचे कारण सांगून वीज बिलासंदर्भात बोलायला टाळतात, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे,’ असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘गरिबांसाठी राज्य सरकार ५ हजार कोटी रुपयांचं कर्ज घेऊ शकत नाही ही फालतुगिरी आहे,’ असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

कालही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला होता. ‘अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधरणार नाही. प्रत्येक गोष्ट ही लोकांची जबाबदारी असेल तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलय काय?,’ असा खडा सवालही त्यांनी केला आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here