पुणे: राज्यात ‘अनलॉक’च्या प्राधान्यक्रमावरून भाजपचे आमदार () यांनी आज ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. ‘मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची चिंता जास्त आहे,’ असा आरोप शेलार यांनी केला.

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्तानं शेलार पुण्यात आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका केली. मतदारांवर अविश्वास दाखवणाऱ्या महविकास आघाडीचा प्रचाराचा, नेत्याचा आणि उमेदवाराचा त्यांनी निषेध केला. ठाकरे सरकारनं राज्याची जी दयनीय अवस्था केली आहे, त्या विरोधात मतदारांनी मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलं. ‘हे सरकार पळपुटे आणि पराधीन आहे. शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. शिक्षणाबाबत सावळागोंधळ आहे. कुठलीही मागणी केली की हे लोक केंद्र सरकारकडं बोट दाखवतात. मराठा आरक्षणचा विषय निघाला की सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवतात. मंदिर उघडा म्हटले की हे मुहूर्त काढणाऱ्यांकडे बोट दाखवतात. पब, बार आणि रेस्टॉरंट उघड्याण्याच्या आधी मंदिरं उघडा, ही मागणी अवास्तव नाही. पण मुख्यमंत्री यांना () मंदिरांपेक्षा बॉलिवूड आणि त्यांच्या चिरंजीवांना () पब व बारची चिंता अधिक आहे,’ असं शेलार म्हणाले. ‘बॉलिवूड मुंबईबाहेर जावं असं आमचं मत नाही,’ असंही त्यांनी पुढं स्पष्ट केलं.

वाचा:

‘शाळा सुरू करण्याबाबत सरकारनं संभ्रम निर्माण केला आहे. परिस्थिती बघून निर्णय घेतला पाहिजे. सरकारनं हा निर्णय घेण्याआधी संबधिताशी चर्चा केली नाही. निर्णय जिल्हाधिकारी घेणार, मुले पाठवायची की नाही हे पालक ठरवणार मग सरकार काय करणार?,’ असा प्रश्नही त्यांनी केला.

वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावरही त्यांनी सरकारला धारेवर धरलं. ‘मोफत वीज देण्याची घोषणा नितीन राऊत यांनी केली होती. आता थकबाकीचे आकडे सांगणाऱ्यांनी मोफत विजेच्या घोषणा करताना वीज कंपन्यांच्या ताळेबंद पहिला नव्हता का? जनतेला गृहित धरता का?,’ अशी विचारणाही शेलार यांनी केली.

‘सामूहिक नेतृत्वावर पक्ष चालतो’

२०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी पक्षानं आमदार यांना दिली आहे. या माध्यमातून शेलार यांचे पंख छाटल्याची चर्चा आहे. त्याबाबत बोलताना, ‘सामूहिक नेतृत्वावर पक्ष चालतो’, असं शेलार म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here