अहमदनगर: ‘गेली काही महिने नाईलाजाने कराव्या लागलेल्या लॉकडाउनचे () भयंकर चटके आपण सहन केले आहेत. लाखो-करोडो लोकांचा रोजगार गेल्याने या लोकांची कुटुंबं मोठ्या अडचणीत आहेत. अशीच परिस्थिती आपल्याला पुन्हा आणायची नसेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. या जबाबदारीचं कोणतंही ओझं नाही तर फक्त प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्यायची आहे,’ असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार यांनी केलं आहे. ( on )

लॉकडाउनच्या काळात आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या विषयावर वेळोवेळी भाष्य करणाऱ्या पवार यांनी हे आवाहन केलं आहे. अनलॉक सुरू झाल्यानंतर विविध गोष्टी खुल्या करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली होती. आता सोमवारपासून सुरू होत आहेत. त्या अनुषंगाने पवार यांनी पालकांना आवाहन केलं आहे. ‘करोनाचे संकट पुन्हा वाढत असल्याने काही देशांत आणि आपल्या देशातही काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन करण्यात येत आहे. मात्र, आर्थिक दृष्टीकोनातून पुन्हा लॉकडाउन आपल्याला परवडणार नाही, त्यामुळं सर्वांनी काळजी घ्यावी,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.

वाचा:

‘राज्यात अनेक जिल्ह्यात ९ वी पासून पुढच्या वर्गातील शाळा सुरू होत आहेत. करोनाचं संकट अद्याप कायम असल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही. हळूहळू सर्वच शाळांचे आवार मुलांनी फुलावेत आणि वर्गातील तोच किलबिलाट पुन्हा ऐकायला मिळावा, मैदानांवर रंगलेले वेगवेगळ्या खेळांचे डाव दिसावेत यासाठी आपण सगळेच आसुसलो आहोत,’ असे म्हणत पवार यांनी वस्तुस्थितीचीही जाणीव करून देताना म्हटलं आहे की, ‘शाळा सुरू झाल्या म्हणजे सगळं काही पूर्ववत झालं असं नाही, तर उलट आपल्याला आणखी जबाबदारीनं वागावं लागणार आहे. यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची राहणार आहे. प्रत्येकानं नियम पाळायचे आहेतच पण दुसऱ्यालाही त्यासाठी भाग पाडायचं आहे. तरच सध्या हळूहळू रुळावर येत असलेला गाडा पुढंही चालू राहील. किंबहुना वेग घेईल. कारण गेली काही महिने नाईलाजानं कराव्या लागलेल्या लॉकडउनचे भयंकर चटके आपण सहन केले आहेत. लाखो-करोडो लोकांचा रोजगार गेल्यानं या लोकांची कुटुंब आज मोठ्या अडचणीत आहेत. अशीच परिस्थिती आपल्याला पुन्हा आणायची नसेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. या जबाबदारीचं कोणतंही ओझं नाही, तर फक्त प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायचीय. एवढं हे सोप्प आहे. आपण ते कराल असा विश्वास आहे,’ असंही पवार यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here