सांगली: ‘ पदवीधर निवडणुकीत गेल्या वेळी यांना निसटता विजय मिळाला. यावेळी पराभव होण्याच्या भीतीनेच त्यांनी पुण्याला जाऊन विधानसभेची निवडणूक लढवली,’ असा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार मेळाव्यात ते शनिवारी सांगलीत बोलत होते. (Uday Samant Criticises Chandrakant Patil)

यावेळी मंत्री सामंत म्हणाले, ‘पुणे पदवीधर मतदारसंघातील गेल्या निवडणुकीचा निकाल सर्वांना माहीत आहे. चंद्रकांत पाटील यांनी अगदी निसटता विजय मिळवला होता. बंडखोरी झाली नसती, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. यावेळी पदवीधरच्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीनेच चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात जाऊन विधानसभेची निवडणूक लढवली. महाविकास आघाडीची ताकत वाढली आहे. राज्यातील विधान परिषदेच्या पाचही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकण्याच्या सूचना मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. बिहारमध्ये तुम्ही काहीही केले असेल, पण महाराष्ट्रात तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे काही वाकडे करू शकणार नाही.’

वाचा:

दरम्यान, करोना संसर्गामुळे राज्यात शाळा सुरू करणे बंधनकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘करोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने सरकारकडून शाळा सुरू करण्याची घाई होणार नाही. शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन, शाळा आणि पालकांवर सोपवला आहे.’ मुंबई आणि ठाण्यातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा:

आचारसंहिता संपताच प्राध्यापक, प्राचार्य भरती सुरू होणार

प्राध्यापक आणि प्राचार्य भरतीच्या स्थगितीबाबत विरोधकांकडून अपप्रचार सुरू आहे. करोना संसर्गामुळे काही कालावधीसाठीच भरती स्थगिती होती. विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Elections) आचारसंहिता संपताच प्राध्यापक आणि प्राचार्यांची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here