पंढरपूर: सर्वच राजकीय पक्षांच्या भेटी घेऊन मर्यादित स्वरूपात करण्याच्या भूमिकेला कोणत्याही पक्षाने साथ न दिल्याने यापुढे येणाऱ्या सर्व निवडणूक प्रक्रियेवर संप्रदाय बहिष्कार टाकेल, अशी घोषणा वारकरी समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आली.

‘प्रत्येक वेळेला शासनाला सहकार्य करूनही वारकरी संप्रदयावर कायम अन्याय होत असेल तर आता संप्रदाय शांत राहणार नाही, अशी भूमिका राणा महाराज वासकर यांनी सांगितले. या पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत वारकरी संप्रदाय गावोगावी जाऊन विठ्ठल भक्तांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करेल,’ असेही वासकर यांनी सांगितले.

वाचा:

‘एका बाजूला पिढ्यानपिढ्या वारी करणाऱ्या वारकऱ्यांना कार्तिकीला येण्यापासून मज्जाव करताना प्रातिनिधिक वारीचा दाखला शासन देत असेल तर मग शासकीय महापूजाही प्रातिनिधिक स्वरूपात करायला उपमुख्यमंत्री कशाला असा सवालही या बैठकीत करण्यात आला. एवढेच नियम पाळायचे असतील तर मग स्थानिक प्रांताधिकार्याच्या हातून कार्तिकी एकादशीची पूजा करावी, असे आवाहनही करण्यात आले.

वाचा: वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here