मुंबई : जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असून सोने दर दोन आठवड्याच्या उच्चांकावर गेला आहे. मंगळवारी सोने दरात प्रती औंस ०.३ टक्के वाढ झाली. सोन्याचा दर प्रति औंस १५६५.३६ डॉलरपर्यंत वाढला आहे. कमॉडिटी बाजारात सोने दरात सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली आहे. मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने दर ०.४५ टक्क्यांनी वाढला आणि तो ४०१२८ रुपयांवर गेला. चांदीच्या किमतीत ०.५३ टक्क्यांची वाढ झाली.

जागतिक बाजारातील घडामोडींचे सोने दरावर परिणाम होत आहेत. इराकमधील बगदाद शहरात अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र डागण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. दावोसमध्ये सुरु झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जगातिक अर्थव्यवस्था मंदीत अडकली असल्याचे म्हटलं आहे. त्याचे पडसाद आज जगभरातील शेअर बाजारांवर उमटले. चीनमधील वायरसचा वाढता धोका आणि मध्य-पूर्वेत अस्थिरतेने जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. सोने दरात मंगळवारी ०.३ टक्क्यांची वाढ झाली. सोन्याचा दर प्रति औंस १५६५.३६ डॉलरपर्यंत वाढला आहे. ८ जानेवारीनंतरचा सोन्याचा हा सर्वाधिक दर आहे.

कमॉडिटी बाजारात सोने दरात सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली आहे. मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने दर ०.४५ टक्क्यांनी वाढला आणि तो ४०१२८ रुपयांवर गेला. चांदीच्या किमतीत ०.५३ टक्क्यांची वाढ झाली. चांदीचा भाव वर प्रति किलो ४६९४९ रुपयांवर गेला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here