पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार – ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. साताऱ्यातील एका अज्ञात व्यक्तीनं फोनवरुन पाटील यांनी धमकी दिली आहे. या प्रकरणी रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मनसेकडून अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सर्वत्र प्रचाराची धामधुम असतानाच रुपाली पाटील यांना सातारा येथील लबाडे अडनाव असलेल्या व्यक्तीनं फोनवरुन धमकी दिल्यानं निवडणुकांमधला तणाव वाढला आहे. ‘आमदार होण्याचा प्रयत्न करु नकोस, जिथे असशील तिथे येऊन संपवू,’ अशी धमकी रुपाली यांना देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणानंतर रुपाली पाटील यांनी पोलिसांत धाव घेत संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच, फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला खुलं आव्हानही दिलं आहे.


कोण आहेत रुपाली पाटील
मनसेचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या रूपाली पाटील पक्ष स्थापनेपासून मनसेत कार्यरत आहेत. त्यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. सध्या त्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कसबा पेठ मतदारसंघातून त्या इच्छुक होत्या. मात्र, पक्षाने शहराध्यक्ष अजय शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here