राज्यात दिवाळीनंतर करोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता प्रत्यक्षात ही शक्यता खरी होत असल्याचं चित्र आहे. ऑक्टोबर महिन्यात करोनाची लाट ओसरत होती. मात्र, दिवाळीनंतर ही चित्र पालटलं आहे. करोना मृत्यू आणि नवीन रुग्णसंख्या यांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळं काहीशी चिंता वाढली आहे. आज राज्यात ६२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्याचा मृत्यूदर २.६२ टक्के इतका आहे.
दिवाळीनंतर राज्यात नवीन बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाकडून आवश्यक असलेली संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. गर्दी टाळतानाच, मास्क वापरण्याबाबतही वारंवार आवाहन करण्यात येत आहे. आज ५ हजार ७६० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आज ४,०८८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६,४७,००४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८२ % एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यात ७९ हजार ८७३ अॅक्टिव्ह केस असून राज्यातील विविध रुग्णलयांत उपचार घेत आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०१,२०,४७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,७४,४५५ (१७.५३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात ५,२२,८१९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,५६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times