म. टा. प्रतिनिधी, पुणेः घराबाहेर पडताना मास्क न घातल्याने तब्बल आठ कोटी ५४ लाख रुपयांचा दंड पुणेकर नागरिकांनी भरला आहे. गेल्या अडीच महिन्यातच पोलिसांनी हा दंड वसूल केला आहे. यासर्व प्रकारामुळे नागरिकांच्या मनात करोनाची भिती आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने केले जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरणच पुणेकरांनी स्विकारले आहे.

दोन सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या अडीच महिन्याच्या काळात पुणे पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या एक लाख ७२ हजार ६३१ जणांकडून तब्बल आठ कोटी ५४ लाख १० हजार ५५० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा पाच हजारांपर्यंत
शहरातील रुग्णसंख्या वाढल्याने आता सक्रिय रुग्णसंख्येत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरात शनिवारी ४४३ जणांना संसर्ग झाला असून सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा पाच हजारापर्यंत पोहोचू लागली आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडत आहे. जिल्ह्यात ही रुग्णसंख्या वाढत असून ९१४ रुग्ण आढळले आहेत.

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे गंभीर रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. दुसरीकडे व्हेंटिलेटरवरील रुग्ण कमी-जास्त होत आहेत. मृतांचा आकडा मात्र दिवसाला दहाच्या आत आहे. शहरात ४८२१ एवढे सक्रिय रुग्ण आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here