गुवाहाटीः आसामचे माजी मुख्यमंत्री ( ) यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यांना गुवाहाटी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. गोगोई यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाले आहेत, अशी माहिती आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी दिली.

गोगोई यांची प्रकृती खालावत शनिवारी सायंकाळपासूनच असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर औषधांच्या सहाय्याने त्यांचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील ४८-७२ तास त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. डॉक्टरांची टीम गोगोईंच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे, असं शर्मा म्हणाले.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या प्रकृतीबद्दल खूप काळजीत आहे. त्यांना लवकर बरं वाटावं आणि प्रकृती ठणठणीत व्हावी, यासाठी प्रार्थना करतो, असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करत म्हटलंय. जयराम रमेश यांनीही ट्विट केलंय. गोगोई हे बळकट प्रकृतीचे आहेत. त्यांच्या चांगल्या आरोग्यसाठी प्रार्थना करतो, असं जयरा रमेश म्हणाले.

८६ वर्षीय ज्येष्ठ राजकारणी तरुण गोगोई नुकतेच करोनातून बरे झाले होते. २ नोव्हेंबरला करोनाहून बरे झाल्यानंतर प्रकृती बिघडल्याच्या तक्रारीवरून त्यांना गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं गेलंय.

गोगाई हे आसामच्या मुख्यमंत्री होते. २००१ ते २०१६ या काळात त्यांनी सलग तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. २६ ऑगस्टला त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली. यानंतर त्यांना गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here