नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जी -20 परिषदेत ( G20 Summit ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली १५ व्या जी -20 शिखर परिषदेत उपस्थित होते. ‘सर्वांसाठी २१ व्या शतकातील संधींची जाणीव’, असा या परिषदेचा विषय हा आहे.

आम्ही जी -20 च्या कुशल कामकाजासाठी डिजिटल सुविधांना आणखी विकसित करण्यासाठी भारताच्या आयटी प्रगतीची ऑफर देत आहोत. आपल्या प्रक्रियेतील पारदर्शकता समाजांना एकत्रितपणे आणि आत्मविश्वासाने संकटाशी लढायला मदत करते. पृथ्वीवरील विश्वासाची भावना आपल्याला निरोगी आणि समग्र जीवनशैली जगण्यास प्रेरणा देईल, असं आपल्या भाषणात म्हणाले.

“जी -20 नेत्यांशी झालेली चर्चा खूप फलदायी झाली. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या समन्वय आणि प्रयत्नाने करोना संकटातून निश्चितच उभारी घेता येईल, असं म्हणत शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाचे आभार मानले.

मल्टी-स्किलिंग आणि टॅलेन्ट पूल तयार करण्यासाठी पुन्हा कौशल्य निर्माण केल्यास आपल्या कामगारांची प्रतिष्ठा आणि लवचिकता वाढेल. नव्या तंत्रज्ञानाचे मूल्य मानवतेला किती लाभ झाला यावर मोजले गेले पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह प्रमुख नेत्यांपैकी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअजिझ अल सौद यांनी आपल्या पहिल्या भाषणात करोनावरील लशीच्या विकासासह उपकरणं “स्वस्त आणि न्यायसुसंगत” असण्यावर भर दिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here