करोनो व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात तामिळनाडू सरकारने केलेल्या उपाययोजनांचे अमित शहांनी कौतुक केले. तसंच केंद्राच्या क्रमवारीनुसार यावर्षी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत तामिळनाडूमधील सरकार हे सर्वात चांगले आहे, असं म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताने करोनाचा प्रादुर्भाव रोखला आहे. तर जागतील बलाढ्य देशांना मात्र संघर्ष करावा लागतोय. करोनाचा प्रादुर्भाव रोखल्याबद्दल मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नेरसेल्वम यांचं शहांनी कौतुक केलं. तामिळनाडूमध्ये करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. तमिळनाडूने करोना संकटात गर्भवती महिलांची जी काळजी घेतली तेवढी इतर कुठल्याही राज्याने घेत नाही, असं शहा म्हणाले.
तामिळनाडूत ९ वर्षांहून अधिक काळापासून एआयएडीएमकेची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने डीएमकेला झटका दिला होता. आता विधानसभा निवडणुकीत डीएमकेला पुन्हा झटका देण्याची तयारी सुरू केलीय.
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने डीएमकेचा पराभव केला तेव्हा. जे जयललिता यांनी पक्षाला शानदार विजय मिळवून दिला होता. यानंतर २०१६ मधील विधानसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने पुन्हा डीएमकेचा पराभव करत मोठा विजय मिळवला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times