नवी दिल्लीः सॅमसंगने भारतात रिपब्लिक डे सुरू केल्यानंतर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अन्य कंपन्यांनी अनेक ऑफर आणल्या आहेत. सॅमसंगने आपल्या टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि मायक्रोवेव यासारख्या उत्पादनावर १५ टक्के कॅशबॅक, ईएमआय आणि झीरो डाऊन पेमेंट यासारख्या सुविधा दिल्या आहेत. या शिवाय सॅमसंग QLED या टीव्ही खरेदीवर ग्राहकांना हमखास बक्षीस देण्यात येणार आहे. सॅमसंगचा टीव्ही खरेदी केल्यानंतर ग्राहकांना ७६ हजारांपर्यंतचा मोफत मिळू शकतो.

सॅमसंगने आपल्या प्रेस रिलिजमध्ये म्हटलेय की, या ऑफरमध्ये ग्राहकांना Samsung QLED आणि 4K UHD टीव्हीच्या काही उत्पादनावर ७६ हजार ९०० रुपये किंमतीचा गॅलेक्सी एस१० (५१२ जीबी), १९ हजार ९९९ रुपये किंमतीचा गॅलेक्सी ए५०एस (४ जीबी), १६ हजार ९०० रुपये किंमतीचा गॅलेक्सी एम३० (६ जीबी), ८ हजार रुपये किंमतीचा गॅलेक्सी ए१०एस आणि ३ हजार ७९९ रुपयाचा सॅमसंग यू फ्लेक्स हेडफोन यासारखे बक्षीस मिळू शकतात. कंपनीने ग्राहकांना या बक्षिसासोबत ३० दिवसाचा झी५ चे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये देणार आहे. सॅमसंगचा हा सेल अल्पायन्स स्टोरवर सुरू आहे. तसेच माय सॅमसंग माय ईएमआय सर्विस वर सुरू होणार आहे. ३१ जानेवारी पर्यंत काही उत्पादने खरेदी केल्यानंतर ग्राहकांना २ वर्षापर्यंत वॉरंटी आणि १० वर्षाची नो स्क्रीन बर्न-इन वॉरटी कंपनीकडून देण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here