मुंबई: संकट अजून टळलेलं नाही, असं सांगत मुख्यमंत्री यांनी आज राज्यातील जनतेला सावध केलं. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी आपल्या खास शैलीत केलेल्या एका विधानाचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. ( CM On Latest Updates )

वाचा:

‘लोक ज्या पद्धतीने बाहेर पडताहेत, गर्दी करताहेत ते पाहून करोना गर्दीत चेंगरून मेला की काय, असे वाटू लागते’, अशा प्रकारचे विधान अजित पवार यांनी पुण्यात केले होते. त्याचा संदर्भ देत ‘अजितदादा उपरोधिकपणे हे बोललेत पण यातून तुम्हाला बोध घ्यायचा आहे. करोना असा चेंगरून वगैरे मरणार नाही. गर्दी केलीत तर करोना आणखी वाढणार आहे, याचे भान राहू द्या’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनाकारण आणि विनामास्क घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांना बजावले.

वाचा:

‘मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे’, असे म्हणतच शिस्त आणि नियम न पाळणाऱ्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी समज दिली. आपण करोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे पण, तसे होताना दिसत नाही. करोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी-तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये काही शहरांत रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे की काय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. तेव्हा कृपा करून सगळं उघडे केलं म्हणजे करोना गेला आहे असा अर्थ होत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वाचा:

आरोग्याची चौकशी जिव्हाळ्याने व्हावी

मोहीम राबविताना यंत्रणेतील सर्व लोकांनी अफाट काम केले आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जनजागृती करणे हे साधेसुधे काम नाही. या मोहिमेचा हेतु केवळ चौकशी करणे नाही तर आरोग्य नकाशा तयार करणे आहे. यामध्ये आपल्याला किती जणांना सहव्याधी आहे ते कळले. या सर्वांशी यंत्रणेतील लोकांनी एक जिव्हाळा दाखवून संपर्क साधणे व चौकशी करणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here