अहमदाबादः करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता ( coronavirus ) गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी ( vijay rupani ) यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत. राज्यात मास्क शिवाय आढळून आल्यास १००० रुपये दंड आकारला जाईल. राज्यातील चार शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचं पालन करावं आणि मास्क घालावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

सोमवारी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत , राजकोट, सूरत आणि बडोद्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी असेल. खबरदारी म्हणून ही पावलं उचलली गेली आहेत. करोनाचा सामना करण्यासाठी सरकारकडे ठोस व्यवस्था आहे. जनतेनं फक्त नियमांचं पालन केलं पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री रुपणी केलंय. रुपाणी यांनी आज जनतेश संवाद साधला. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्र्यांनी रुपाणी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.

करोना व्हायरसचा सामना संपूर्ण जग करत आहे. आता राज्य सरकारने अहमदाबाद, बडोदा, सूरत आणि राजकोट या चार मोठ्या शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी या निर्णयाने घाबरण्याचे कारण नाही. राज्य सरकारचा आरोग्य विभाग नागरिकांना सुविधा देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असं रात्रीच्या संचारबंदीबाबत उपमुख्यमंत्री नितीन पटेल म्हणाले.

सरकारी रुग्णालयांमध्ये करोना संसर्ग झालेल्या रूग्णांसाठी पुरेसे बेड नसल्याचं सोशल मीडियावरून पसवलं जात आहे. यात कुठलंही तथ्य नसल्याचं पटेल म्हणाले.

पटेल यांनी रिक्त बेडसंदर्भात माहिती दिली. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल हे विशेष कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. १,२०० खाटांच्या या रुग्णालयात जवळपास ६० आयसीयू व्यवस्था अलिकडेच करण्यात आलीय. यासह या रुग्णालयात आणखी १२० बेडची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे काम पूर्ण होण्यात आहे, असं उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here