पुणे: ‘शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी कायम चांगले बोलत आलो आहे. मी आरक्षणासाठीच्या कायदेशीर बाबींविषयी काही गोष्टी बोललो. यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतु नव्हता,’ असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी स्पष्ट केले. ( On Chief And )

वाचा:

‘शरद पवारांबद्दल मला चुकीचे बोलायचे नव्हते, कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. कोणत्याही नव्या आरक्षणामुळे विद्यमान आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी कराव्या लागणाऱ्या कायदेशीर तरतुदींसंदर्भाने मी बोलत होतो. राष्ट्रवादीचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. यांना टरबुज्या; तर मला चंपा म्हणतात. हे कसे चालते,’ असा सवालही पाटील यांनी केला. त्याचबरोबर ‘माझ्यादृष्टीने हा विषय आता संपला आहे. ज्यांना पवारांवरची निष्ठा दाखवायची आहे, त्यांनी बोलत राहावे, मी कोणाला घाबरत नाही,’ असेही पाटील म्हणाले.

वाचा:

‘समान विचारधारा नसलेले, एक झेंडा नसलेले पक्ष सरकार चालवत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये प्रचंड गोंधळ आहे. कोणाचाही पायपोस कोणाला नसल्याने एकमताने निर्णय होत नाहीत. यात जनता भरडली जात आहे. शाळा सुरू करण्याबाबत धड निर्णय घेतलेला नाही. विद्यापीठाच्या परीक्षा घ्यायच्या म्हणून घेतल्या. कॉर्पोरेट कंपन्या या वर्षीच्या विद्यार्थ्यांना बाजूला ठेवतील. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका न घेतल्यानेच एमपीएससी परीक्षा, अकरावी प्रवेश आदी बाबी रखडल्या आहेत. यात राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याचे परिणाम शिक्षक-पदवीधर निवडणुकीत दिसून येतील,’ असे पाटील म्हणाले.

वाचा

‘ सामाजिक प्रश्नांवर बोलतात, त्यावर तळमळीने व्यक्त होतात. मात्र, जोपर्यंत आपली परप्रांतीयांबाबतची भूमिका ते बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही,’ असे पाटील म्हणाले. निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्याबाबत ‘कोण हे टिळेकर? मी त्यांना ओळखत नाही,’ असेही पाटील म्हणाले. राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती हा राज्यपालांचा अधिकार आहे. त्यावर मी बोलणार नाही; पण महाविकास आघाडीतील नेते याबाबत जणू राज्यपालांना धमकी दिल्यासारखीच भाषा वापरत आहेत, असे पाटील म्हणाले.

‘पुन्हा लॉकडाऊन नको’

नव्याने लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, राज्य सरकारनेच करोनासोबत जगावे लागेल, असा आग्रह धरला होता. आता सर्व गोष्टी मार्गी लागत असताना आर्थिक गाडे उलटे नेण्यात काही अर्थ नाही. काळजी घेऊन सर्व व्यवहार सुरूच ठेवावे लागतील. वैद्यकीय तज्ज्ञांनीच शिफारस केली; तर लॉकडाऊनबाबत विचार करता येईल,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here