वाचा:
देशातील दिल्ली, अहमदाबाद, सूरत अशा मोठ्या शहरांमध्ये करोनाचा उद्रेक पाहायला मिळत असताना महाराष्ट्रातील करोनाच्या आकड्यांवरही सरकारी यंत्रणांचे बारीक लक्ष आहे. राज्यात दिवाळीनंतर करोनाचे आकडे वेगाने बदलत आहेत. रविवारी करोनातून बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने बाधित झालेल्या रुग्णांचा आकडा अधिक राहिला. ही बाब काहीशी चिंता वाढवणारी ठरली आहे. करोना रिकव्हरी रेटही गेल्या काही दिवसांपासून वाढलेला नसून मृतांचा घटलेला आकडा ही मात्र दिलासा देणारी बाब ठरली आहे.
वाचा:
राज्यात आणखी ५० रुग्ण करोनामुळे दगावले आहेत. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ४६ हजार ६२३ इतकी झाली आहे. रविवारी सर्वाधिक १९ मृत्यू पालिका हद्दीत झाले तर नागपूर पालिका व जिल्ह्यात मिळून १२ रुग्णांचा मृत्यू झाला. पालिका व पुणे जिल्हा हद्दीत मिळून दिवसभरात ११ मृत्यू झाले. त्यात पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत एकाही मृत्यूची नोंद नव्हती. , पालघर, रायगड, नाशिक या जिल्ह्यांतही रविवारी करोनाचा एकही रुग्ण दगावला नाही. राज्यात आता करोना मृत्यूदर २.६२ टक्के इतका असून हे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत आहे.
वाचा:
राज्यात आणखी ४ हजार ६० रुग्ण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत १६ लाख ५१ हजार ६४ रुग्णांनी या आजाराला मात देण्यात यश मिळवले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.७५ टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी २ लाख १३ हजार २६ करोना चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातील १७ लाख ८० हजार २०८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८१ हजार ५१२ इतकी आहे. सध्या राज्यात ५ लाख १५ हजार ९७६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ५ हजार ६१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times