पाटणाः बिहारच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची स्थापना ( ) झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार ( ) कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नितीशकुमार ( ) हे आठवड्याभरात मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करतील. मंत्रिमंडळ विस्तार येत्या रविवारी २९ तारखेला होऊ शकतो. विधिमंडळाचं कामकाज संपल्यावर लगेच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगण्यात येतंय.

मंत्रिमंडळ विस्तारात भाजप मंत्र्यांचा कोटा वाढू शकतो. सध्या भाजपच्या कोट्यातून ७ आणि जेडीयूच्या कोट्यातून ५ मंत्री आहेत. यापैकी जेडीयू कोट्यातील मेवालाल चौधरी यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मंत्रिमंडळात सध्या जेडीयूचा कोट्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह ५ मंत्री आहेत.

भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांची संख्या १९ होऊ शकते

बिहारमधील धाकट्या भावाची भूमिका साकारणारा एनडीएतील भाजप यावेळी ७४ जागा जिंकून मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. त्याचा परिणाम सर्वत्र दिसतोय. मागील सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातून उपमुख्यमंत्र्यांसह १३ मंत्री होते. मुख्यमंत्र्यांसह जेडीयू कोट्यातील २२ मंत्री होते. सध्याच्या विस्तारात भाजप कोट्यात मंत्र्यांची संख्या १९ आणि जेडीयू कोटा १६ पर्यंत असू शकते.

मंत्रिमंडळ विस्तारात सध्या जेडीयू कोट्यात मुख्यमंत्र्यांसह ५ मंत्री आहेत. आणखी ११ जण शपथ घेऊ शकतील. म्हणजेएकूण संख्या १६ होईल. भाजपकडे सध्या ७ मंत्री आहेत. आणखी १२ मंत्री होऊ शकतात म्हणजे एकूण संख्या १९ होईल. बिहारमध्ये एकूण ४४ विभाग आहेत. पण मंत्र्यांकरता केवळ ३६ खाती आहेत. उर्वरीत सर्व खाती मुख्यमंत्र्याकडे आहेत.

आता एका मंत्र्याकडे ५-५ खात्यांचा कार्यभार

नितीशकुमार यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांसमवेत १६ नोव्हेंबरला शपथ घेतली होती. पण त्यावेळी काही मोजक्या नेत्यांनीच शपथ घेतली. यामुळे प्रत्येक मंत्र्याला पाच खात्यांची जबाबदारी देण्यात आली.

उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे ६ खाती आहेत. विजय कुमार चौधरी आणि अशोक चौधरी यांच्याकडे प्रत्येकी ५ खाती आहेत. तर विजेंदर प्रसाद यादव यांच्याकडे ४ खाती आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री रेणू देवी, मंगल पांडे, अमरेंद्र प्रताप आणि जीवेश कुमार यांच्याकडे प्रत्येकी ३ खाती आहेत. राम सुंदर राय आणि संतोषकुमार सुमन यांच्याकडे प्रत्येकी २ आणि शीला कुमारी, मुकेश सहनी आणि रामप्रीत पासवान यांच्याकडे प्रत्येकी एक खातं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here