सोलापूर: पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ रविवारी सोलापुरातील हेरिटेज लॉन येथे आयोजित बैठकीप्रसंगी व्यासपीठामागे लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी केंद्रीय मंत्री आणि आमदार यांची छायाचित्रे नसल्याने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. अखेर राज्यमंत्री यांनी मध्यस्थी केल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते शांत झाले. ( In MLC elections Latest Updates )

वाचा:

रविवारी आयोजित केलेल्या प्रचार सभेसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, पालकमंत्री दत्तात्रय भरणे स्टेजवर उपस्थित होते. मात्र, व्यासपीठावरील बॅनरवर सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचे छायाचित्रे नसल्याने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सभेत गोंधळ घातला. निषेधाच्या घोषणा देत नाराजी व्यक्त केली. मात्र, राज्यमंत्री सतेज पाटील यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केल्याने वातावरण शांत झाले.

वाचा:

‘शिंदे साहेबांचा फोटो नजरचुकीने राहिला असून, शिंदेसाहेब आमच्या हृदयात आहेत,’ असे पाटील यांनी सांगितल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. सुशीलकुमार आणि आमदार प्रणिती शिंदे मागासवर्गीय असल्याने राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक छायाचित्र टाकणे टाळले असल्याचा आरोप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here