अहमदाबादः अहमदाबाद, बडोदा, राजकोट आणि सूरतमध्ये अनिश्चित काळासाठी रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारने ( ) दिल्या आहेत. दुसरीकडे राज्यात १५ जूनपासून मास्क न घालणाऱ्या २६ लाख नागरिकांकडून ७८ कोटी रुपयां दंड वसूल करण्यात आला आहे. ही रक्कम ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या वर्षभराच्या कमाईपेक्षा जास्त आहे.

गुजरातच्या केवडियामध्ये ३१ ऑक्टोबर २०१८ ला स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन झालं. यानंतर ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पर्यटकांकडून ६३.५० कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं.

अहमदाबादमध्ये मिनिटाला १२० जणांना दंड

गुजरातमधील सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या सतत सूचना असूनही नागरिक घराबाहेर पडताना मास्क घालत नाहीत. अहमदाबाद शहरातच प्रत्येक मिनिटाला मास्क न घालणारे १२० हून अधिक जण दंड भरत आहेत. अहमदाबाद हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम असोसिएशननेही मास्क घालणाऱ्यांकडून अधिक दंड वसूल करण्याचं आवाहन केलं आहे.

करोनापासून बचाव करण्यासाठी बाहेर पडताना मास्क घालणं आवश्यक आहे, अशा सूचना राज्य सरकार आणि प्रशासनाने दिल्या आहेत. यामुळे राज्य सरकारने नागरिकांना स्वस्तात मास्क उपलब्ध करून दिले आहेत. अमूलच्या दूध पार्लरमध्ये ५ मास्कचे पॅकेट फक्त १० रुपयांना उपलब्ध मिळत आहे. असं असूनही नागरिक दोन रुपयांचा मास्क घालायला तयार नाहीत. मास्क न घालणाऱ्यांना १ हजार रुपयांता दंड भरावा लागतोय.

मास्क न घालणाऱ्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर १ हजार रुपये दंड भरावा लागेल. अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर थेट रुग्णालयात पाठवला दाखल केलं जाणार आहे.

कारवाईसाठी १४१ जणांची टीम

करोना अनलॉकच्या नियमांचे पालन करण्यासाठी पोलिस कर्मचारी सज्ज आहेत. तसेच महापालिकेनेही १४१ कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली आहे. मास्क न घालणारे आणि सार्वजनिक थुंकणाऱ्यांवर ते कारवाई करतात. शहरातील ७ झोनमध्ये अशा टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here