म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: पूर्ववैमनस्यातून तिघांनी मिळून मित्राचा धारदार हत्याराने वार करून खून केला. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, हिंजवडीत शनिवारी (२१ नोव्हेंबर) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

निवल सुकलाल पावरा (वय २७, रा. साखरे वस्ती, ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, या प्रकरणी त्यांच्या पत्नी हिरा पावरा यांनी फिर्याद दिली आहे. बबल्या उर्फ महेंद्र तेलगोटे, गोल्या उर्फ शरद पवार (दोघेही रा. साखरे वस्ती, हिंजवडी), सागर कदम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शनिवारी रात्री पावरा यांच्या घरी आले. ‘तुझ्याकडे महत्त्वाचे काम आहे,’ असे सांगून निवल पावरा यांना बरोबर घेऊन गेले. त्यानंतर जुन्या भांडणाचा राग मनात धरून हिंजवडीतील रेडिसन ब्लू हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत निवल यांच्या डोक्‍यात धारदार शस्त्राने वार करून डोक्‍यात दगड घातला. यामध्ये निवल यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक निरीक्षक शशिकांत देडगे तपास करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here