वाकोला दत्त मंदिर परिसरामध्ये राहणाऱ्या महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीच्या मागे मयूर जोशी लागला होता. जाता-येता मयूरकडून होत असलेल्या शेरेबाजीला ही तरुणी कंटाळली होती. याबाबत घरच्यांना न सांगता तिने कॉलेजचा मित्र मानस मोरे (१९) याला मयूरबाबत सांगितले. मयूरला धडा शिकविण्याचे मानसने ठरविले आणि त्याला जाब विचारण्यासाठी आणखी चार मित्रांना घेऊन तो गुरुवारी रात्री या परिसरात आला. मानस आणि त्याच्या मित्रांनी मयूर याला एकटे गाठले आणि मैत्रिणीला त्रास कशाला देतोस, असे विचारून हटकले. त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. मानस आणि त्याच्या चार मित्रांनी मयूरला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली.
या घटनेबाबत कळताच मयूरचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. मारहाणीत जबर मार लागल्याने म्युरल जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी मयूर याचा मृत्यू झाला. वाकोला पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मानस आणि त्याच्या चार मित्रांना अटक केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times