मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर ‘कराची स्वीट्स’ हे नाव बदला, अशी तंबी शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांनी अलीकडेच वांद्र्यातील एका दुकानमालकाला दिली होती. खासदार संजय राऊत यांनी तात्काळ पुढं येत ही मागणी चुकीची असल्याचं म्हटलं होतं. ‘निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही,’ असा खुलासा त्यांनी केला होता.
वाचा:
फडणवीस यांनी या वादावर भूमिका मांडताना राऊत यांना टोला हाणला होता. ‘राऊत यांनी आधीच आपल्या कार्यकर्त्याला सांगायला हवं होतं,’ असं ते म्हणाले. ‘भाजपपुरतं बोलायचं झाल्यास आम्ही ‘अखंड भारत’ संकल्पनेवर विश्वास असलेले लोक आहोत. कराची एक दिवस भारताचा भाग होईल असा आमचा विश्वास आहे,’ असंही ते म्हणाले होते.
वाचा:
संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. ‘आधी पाकिस्ताननं बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीला आपण नंतर जाऊ,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं ही शाब्दिक चकमक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times