वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना देण्यात आलेल्या सरसकट बिलांची होळी आणि सरकारच्या फसव्या धोरणांचा निषेध करण्यासाठी विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणी बुद्रूक येथे आंदोलन करण्यात आले. वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.
वाचा:
सरकारच्या धोरणावर टिका करताना विखे पाटील म्हणाले, ‘लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सामान्य माणसाला वीज वितरण कंपनीने सरसकट बिले पाठवून ग्राहकांवर आर्थिक भूर्दंड टाकला आहे. या सरसकट वीज बिलांची वसुली वितरण कंपनीने तातडीने थांबवावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाचा:
‘१०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची मागणी सरकारकडे कोणीही केली नव्हती. परंतू संवग लोकप्रियतेसाठी महाविकास आघाडी कडुन केवळ घोषणा आणि आश्वासने दिली जात आहेत. उर्जा मंत्र्यांनीच स्वत:च्या घोषणेपासुन पळ काढला आहे. या घोषणेची पुर्तता करुन तातडीने १०० युनिट पर्यंत वीजबील माफ करण्याचा आग्रह सरकारकडे आम्ही धरणार आहे. महाविकास आघाडी सरकारची मागील वर्षभरात फक्त घोषणाबाजी सुरु असुन, कर्जबगारी मात्र शुन्य आहे. सरकारच्या कोणत्याही धोरणात आणि निर्णयात स्पष्टता नाही. केवळ निर्माण झालेल्या प्रश्नांपासुन जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे काम मंत्र्यांकडुन केले जाते. वीज बिल माफीची नागरिकांची मागणी दुर्लक्षीत व्हावी म्हणून अचानक या सरकारने घाईत उर्जा धोरण जाहीर केले. तुमच्या तिजोरीत जर पैसाच नाही तर मग घोषणा करता कशाला? अशा प्रश्न उपस्थित करुनविखे पाटील म्हणाले की, ‘काही घडले तरी केंद्राकडे बोट दाखवायचे हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा केवळ अपयश झाकण्याचा प्रयत्न असुन, राज्यातील जनतेशी केलेल्या विश्वास घातामुळे या सरकारचा फ्यूजच उडाला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times