मुंबईः यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. यांचे नातू यांनीही चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर, भाजप नेते यांनी रोहित पवारांच्या या ट्विटला प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. ‘सचिनकडून एखादा बॉल सुटला तर पोटावरील एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन टीव्हीवर मॅच पाहणारा मित्र ओरडायचा.. अर्रर्रर्र सचिनला खेळताच येत नाही…., पवार साहेबांसोबत चंद्रकांत दादांनी केलेले वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं,’ असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. रोहित पवारांच्या या टीकेवर निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवारांच्या ट्विटवर उत्तर देताना निलेश राणे यांनी म्हटलंय की, ‘सचिनची तुलना होऊ शकत नाही. सचिन आऊट जरी झाला तरी देशाला त्याच्यावरती विश्वास होता की जे काही करेल ते सचिनच करेल, देशाचं सोडा पण महाराष्ट्रात पण कोणालाही पवार कुटुंबावर विश्वास नाही. साखर कारखान्यांच्या पलीकडे ज्यांना महाराष्ट्र दिसत नाही त्यांनी बोलू नये,’ अशा पलटवार निलेश राणे यांनी केला आहे.

निलेश राणे यांनी रोहित पवारांच्या ट्विटवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आता रोहित पवार त्यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसंच, हा वाद आता आणखी चिघळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याआधीही रोहित पवार आणि निलेश राणे या दोन तरुण नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here