मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर मुंबईतील गोरेगावात हल्ला झाला. या पार्श्वभूमीवर भाजपनं राज्य सरकारच्या या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

एनसीबीकडून गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. त्यावरुनच बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन लवकरच उघड होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्या अनुषगांने एनसीबीनं ठोस पावलंही उचलली होती. पण, एनसीबी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळं भाजप नेते यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

‘मुंबईत ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. ड्रग्ज रॅकेट उघडे पडू नये म्हणून असे हल्ले कोण घडवून आणतोय? कोणाला सत्य समोर येईल याची भीती वाटतेय? हे हल्लेखोर कोण? त्यांचे रक्षक कोण? अधिकाऱ्यांवर हल्ले करुन जंगलराज आणताय का महराष्ट्रात?,’ असे अनेक प्रश्न आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहेत.

जवळपास ६० जणांच्या टोळीने केला हल्ला

वानखेडे आणि त्यांच्या पथकावर जवळपास ६० जणांनी हल्ला चढवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्यात पथकातील दोन अधिकारी जखमी झाले. एनसीबीचे अधिकारी कॅरी मॅंडिस या ड्रग तस्कराला अटक करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच, मुंबई पोलीस तिथे पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणून पथकातील अधिकाऱ्यांचा हल्लेखोरांपासून बचाव केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here