मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार अयोज मेहता यांनी मुंबईतील नरिमन पॉईंट या परिसराक सव्वा पाच कोटींचा फ्लॅट विकत घेतला आहे. ऑक्टोबरमध्येच या घरासाठी व्यवहार करण्यात आला होता.

१ हजार ०७६ चौरस मीटर कार्पेट एरिया असलेला हा फ्लॅट मंत्रालयाजवळच्या भोसले मार्ग परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत यांनीही ही माहिती खरी असल्याचं स्पष्ट केलं आहे, शिवाय, मेहता यांना फ्लॅटसह त्याच इमारतीत दोन पार्किंग स्लॉट मिळाले आहेत. हा फ्लॅट त्यांनी बाजारभावानं खरेदी केला असून बाजारभावानुसार या फ्लॅटची किंमत ५ कोटी ३३ लाख इतकी आहे. तसंच, या व्यवहाराची सर्व कागदपत्र पब्लिक डोमेनमध्येही उपलब्ध आहेत.

मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, हा फ्लॅट खरेदी करताना मेहता यांनी आरटीजीएसनं २ कोटी ७६ लाख रुपये भरले आहेत. तर, तीन लाख ९७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम कर म्हणून कापण्यात आली आहे. पुण्यातील अनामित्रा प्रायव्हेट कंपनीनं स्टॅम्प ड्युटी म्हणून १० लाख ६८ हजार रुपये भरले आहेत. याच कंपनीने हा फ्लॅट मेहता यांना विकला आहे.

२००९ साली अनामित्रा कंपनीनं चार कोटी रुपयांना हा फ्लॅट खरेदी केला होता. २८ ऑगस्ट २०२० साली मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १६ लाख ८० हजार रुपयांना हा फ्लॅट ट्रान्सफर करायला परवानगी दिली होती.

कोण आहेत अजोय मेहता?

१९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. आता ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

धुळ्याचे परिविक्षाधीन साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर साहाय्यक जिल्हाधिकारी अहमदनगर, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक महापालिकेचे आयुक्त, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त (सुधार); केंद्र सरकारचे फलोत्पादन विभागाचे संचालक; महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) चे व्यवस्थापकीय संचालक; महाराष्ट्र राज्य वीज सुत्रधारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक; पुनर्रचित रत्नागिरी वायू व वीज मंडळावर नियुक्ती, महाराष्ट्र राज्य शासनाच्या उर्जा खात्याचे प्रधान सचिव; महाराष्ट्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष; फेब्रुवारी २००९ ते जानेवारी २०१५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) चे व्यवस्थापकीय संचालक, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आणि त्यानंतर एप्रिल २०१५ पासून ते मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते.

अत्यंत महत्त्वाच्या विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या कुशलतेने सांभाळणाऱ्या मेहता यांनी नाशिकमध्ये महापालिका आयुक्त असताना तेथे १९९२-९३ मध्ये कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन केले. मेहता यांची केंद्र सरकारने व्ही. के. शुंगलू यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या ‘वितरण सेवांची सुधारणा व आर्थिक स्थिती’ या विषयावरील उच्चस्तरीय समितीमध्येही नियुक्ती केली होती

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here