नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये ( jammu ) दहशत पसरवणं आणि राजकीय प्रक्रियेत व्यत्यय आणण्याचे पाकिस्तानचे कट कारस्थान भारताने गांभीर्याने घेतले आहे. भारताने निवडक देशांच्या राजदूतांना याबद्दल सोमवारी सविस्तर माहिती दिली. कशा प्रकारे प्रशिक्षित जैश-ए-मोहम्मदचे ( ) दहशतवादी भारतात कसा दहशतवाद पसवण्यात गुंतले आहेत? परराष्ट्र सचिवांनी त्यांना सांगितले. जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये ( ) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर आढळून आलेली शस्त्रे आणि इतर वस्तूंवरून या मागे पाकिस्तानचा हात असल्याचं सिद्ध झालं आहे. राजदूतांशी झालेल्या चर्चेदरम्यान यासंबंधी डॉसियरही देण्यात आले.

काश्मीर खोऱ्यात सांबा सेक्टरमध्ये सापडलेल्या भुयाराव पाकिस्तान दहशत पसरवण्यात कसा गुंतला आहे हे सिद्ध होतं, असं सांगत परराष्ट्र सचिवांनी माहिती दिली. आणखी बऱ्याच देशांच्या राजदूतांना याबाबत माहिती दिली जाईल. काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तान सातत्याने जागतिक स्तरावर प्रपोगेंडा करत आहे. भारत विविध विदेशांच्या राजदुतांशी संपर्क करून पाकच्या या प्रपोगेंडाला पुराव्यानिशी उत्तर देण्याचा प्रयत्न भारत करत आहे.

पंतप्रधान मोदींनी घेतली उच्च स्तरीय बैकठ

यापूर्वी गेल्या शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवल, परराष्ट्र सचिव आणि सुरक्षा यंत्रणांचे प्रतिनिधी आणि गुप्तचर संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांच्या कर्मचार्‍यांचं कौतुक केलं आणि त्यांना सतर्क राहण्यास सांगितलं. जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये गेल्या आठवड्यात गुरुवारी जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना काही तासांच्या चकमकीनंतर ठार मारण्यात यश आलं.

पाकला ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचे ट्विट

एनएसए अजित डोभाल यांच्या नेतृत्वात सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काश्मीरमधील सद्यस्थितीची माहिती दिली. जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य होत असलेली स्थिती आणि राजकीय प्रक्रिया सुरू झाल्याने पाकिस्तानचा जळफळाट होतोय आणि दहशतवाद्यांच्या मदतीने हस्तक्षेप करण्याचा कट रचला जातोय, अशी माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं. साधारणपणे पंतप्रधान मोदी अशा बैठकीविषयी ट्विट करत नाहीत. पण पाकिस्तानला कडक संदेश देण्यासाठी त्यांनी ट्विट केल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here