वाचा:
मुंबईत दिवाळीआधी करोनाचा ग्राफ खाली आला होता. पाडव्यादिवशी म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी ४०९ नवीन बाधितांची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर पुढे नवीन रुग्णांचा आकडा वाढतच गेला. २० नोव्हेंबर रोजी करोनारुग्णांचा दैनंदिन आकडा हजारपार गेला व १०३१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे १०९२ आणि ११३५ नवीन बाधितांची नोंद झाली. हा वाढता आकडा सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरला. पालिकेची आरोग्य यंत्रणाही त्यामुळे कमालीची सतर्क झाली. मुंबईची वाटचाल करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दिशेने सुरू असल्याचे हे संकेत असल्याचेही बोलले जाऊ लागले. मात्र, आज अचानक करोनारुग्णांचा आकडा कमी झाला आणि तात्पुरता का असेना आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. मुंबईत पुढचे काही दिवस करोनारुग्णांचा आकडा घटता राहिल्यास ती फार समाधान देणारी बाब ठरणार आहे. त्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत.
वाचा:
मुंबईतील सोमवारच्या आकडेवारीवर नजर मारल्यास ८०० नवीन रुग्ण आढळले तर ३७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात १४ रुग्ण दगावले असून त्यातील १२ रुग्णांना आधीपासूनच दीर्घकालीन आजार होते व ११ जणांचे वय ६० वर्षांवर होते, असे नमूद करण्यात आले आहे. मुंबईत करोना रिकव्हरी रेट ९२ टक्के इतका असून मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर २३३ दिवसांवर गेला आहे.
आठ दिवसांतील चढउतार
१६ नोव्हेंबर : ४०९
१७ नोव्हेंबर : ५४१
१८ नोव्हेंबर : ८७१
१९ नोव्हेंबर : ९२४
२० नोव्हेंबर : १०३१
२१ नोव्हेंबर : १०९२
२२ नोव्हेंबर : ११३५
२३ नोव्हेंबर : ८००
वाचा:
जिल्ह्यात ६३४ नवे रुग्ण
ठाणे जिल्ह्यात सोमवारी नवीन ६३४ करोना बाधित रुग्णांची वाढ तर दहा रुग्ण दगावल्याची नोंद झाली. जिल्ह्यातील बाधितांचा एकूण आकडा दोन लाख २४ हजार १६१ इतका झाला असून यापैकी दोन लाख १२ हजार ६५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या सहा हजार ५४८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर करोना बळींची संख्या वाढत पाच हजार ६०९ इतकी झाली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times