गुरुग्राम: हरयाणाच्या गुरुग्राममध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन आता पोलीस अधिकारी ( ) तसेच प्रशासकीय अधिकारीही करतील. कारण ( ) साथीच्या काळात मोठ्या समारंभात जारी केलेले प्रोटोकॉल तपासणं बंधनकारक आहे.

गुरुग्रामचे पोलीस आयुक्त के. के. राव यांनी यासंदर्भात आदेश जारी केलेत. कुठल्याही निमंत्रणाशिवाय पोलीस शहरातील कोणत्याही लग्न समारंभात उपस्थित राहू शकतात आणि मास्क न घालणाऱ्यांना दंडही करू शकतात. पोलीस पाहुण्यांवर लक्ष ठेवतील आणि करोनो व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याचं आवाहन करतील, असं आयुक्तांनी आदेशत म्हटलं आहे.

हरयाणामध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारी राज्यात २६६३ नवीन रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या ही २,१९,९६३ इतकी झाली आहे. तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या वाढून २,२१६ वर पोचली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने ताजी आकडेवारी दिलीय. गुरुग्राम जिल्ह्यात सर्वाधिक ८६६ नवीन रुग्ण आढळलेत. तर फरीदाबादमध्ये ५७७ नवीन आढळलेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here