नवी दिल्लीः देशात करोना रुग्णांची ( ) संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ( ) सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पण त्यात पूर्ण यश मिळवलेलं नाही. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ( pm modi ) मंगळवारी दोन बैठका घेणार आहेत. लशीच्या वितरणासंदर्भात होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान मोदी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत.

केरळ, पश्चिम बंगाल, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत पंतप्रधान मोदी पहिली बैठक घेतील. ही बैठक सकाळी १०.३० ते १२ दरम्यान होईल. दुसर्‍या बैठकीत पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसोबत करोनावरील लशीच्या वितरणावर चर्चा करतील.

करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी ७ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी असेल. तसंच रात्रीच्या वेळी लग्न सोहळे किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न समारंभ दिवसाच संपले पाहिजे. गुजरात सरकारने १०० नागरिकांना लग्नं, रिसेप्शन आणि इतर समारंभांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.

उत्तर प्रदेशात योगी सरकारनेही लग्नांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. करोनाच्या संकटाच्या या काळात लग्न सोहळ्यांमध्ये १०० हून अधिक पाहुण्यांना परवानगी नाही, असं सरकारने म्हटलं आहे. यापूर्वी २०० पाहुण्यांना परवानगी देण्यात आली होती. तसंच करोना संबंधी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यावरही सरकारने भर दिला आहे. योगी सरकारच्या या निर्णयाने लग्न ठरवलेल्या कुटुंबांमध्ये नाराजी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here