वाचा:
‘माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिकात्मक चितेवर वीजबिलांना अग्नी दिल्याचे दृश्य मी टीव्हीवर बघितले. चितेला अग्नी देण्याचा अधिकार वारसालाच असतो आणि महावितरणच्या आजच्या स्थितीचे खरे ‘वारस’ चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत. ऊर्जा खात्यातील कंपनी त्यांच्याच कार्यकाळात मरणपंथाला लागली. त्यामुळे वीजबिलाच्या प्रतिकात्मक चितेला त्यांनी अग्नी देणे संयुक्तिक होते’, अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर तोफ डागली.
वाचा:
चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणला रुग्णशय्येवर नेले असले तरी आम्ही त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. महावितरणच्या आजारावर उपचार आम्हीच करू. त्याला नवसंजीवनी देण्याचे काम करू. महावितरण पुन्हा धडधाकट करणे हेच आमचे पहिले प्राधान्य राहणार आहे, असेही राऊत यांनी पुढे नमूद केले.
नेमकं काय घडलं?
नागपूरच्या कामठी मतदारसंघातील महादुला येथे प्रदेश सरचिटणीस आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी बावनकुळे यांनी वीजबिलांना अग्नी दिला व सरकारविरुद्ध आक्रोश व्यक्त केला. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी सरकारवर जोरदार निशाणाही साधला. ‘आपल्याच आश्वासनांना हरताळ फासणाऱ्या नाकर्त्या सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात दुकाने, ऑफिसेस बंद होती तरी लाखा-लाखांची बिले अनेकांना पाठवण्यात आली आहेत. धंदा बंद असताना लाँड्री, सलूनसारख्या व्यावसायिकांनी बिले भरायची तरी कशी, हा विचार सरकारने केला नाही. तेवढी संवेदनशीलताच या सरकारकडे नाही, असा आरोप करताना बिल भरले नाही म्हणून गोरगरीबांच्या घरचा वीजपुरवठा तोडण्यासाठी महावितरणचे अधिकारी गेले तर भाजपा कार्यकर्ते त्यांना प्रतिबंध केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times