कोल्हापूरः पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील श्री करवीर निवासिनी ( ambabai kolhapur ) ,केदारलिंग (जोतिबा), ओढ्यावरील सिद्धीविनायक मंदिर, दत्त भिक्षालिंग सह तीनहजार बेचाळीस मंदिरातील दर्शन वेळेत वाढ करण्याचा निर्णय देवस्थान समितीचे मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला आहे.

दर्शनाची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२ होती ती आता सकाळी ७ ते दुपारी १२ तर सायंकाळी ४ ते ७ करण्यात आली आहे तसेच दर्शन आता ई पासद्वारे घेता येणार असून यासाठी देवस्थान समितीचे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल फॉर्म भरल्यानंतर ई पास तयार होईल या भक्तांसाठी वेगळी रांग करण्यात येणार असून हि सुविधा संपूर्ण मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here