सांगली: ‘पवार काकांबद्दल गोडवे गाणाऱ्या अजितदादांनी गतवर्षी तीन दिवसांसाठी का होईना काकांना सोडले होते, हा इतिहास नाही का? आगामी काळात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी उपमुख्यमंत्री यांना लगावला. तसेच मंत्री जयंत पाटील यांनाही पुढील विधानसभा निवडणुकीत पाहूच, असे आव्हान त्यांनी दिले आहे. ( again targeted )

वाचा:

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवारी इस्लामपूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले. ते म्हणाले, ‘ओबीसी आरक्षणावरून केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. आरक्षणाबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांना फारशी माहिती नसल्याचे मी बोललो होतो. मात्र, यावरून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी माझ्यावर पलटवार केला. उपमुख्यमंत्री अजित पवारही माझ्याबद्दल बोलले. पवार काकांचे गोडवे गाणाऱ्या अजितदादांनी गतवर्षी तीन दिवसांसाठी का होईना काकांना सोडले होते, हा इतिहास नाही का? आगामी काळात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील.’

वाचा

जयंतरावांची सुट्टी केली असती!
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावरही चंद्रकांत पाटील यांनी तोफ डागली. ते म्हणाले, ‘गतवर्षी विधानसभेच्या निवडणुकीत मी कोथरूडला अडकलो, त्यामुळे इस्लामपुरात लक्ष देता आले नाही. आमच्यात मतभेद नसते तर जयंतरावांची सुट्टी केली असती. मग ते राज्याचे नव्हे तर तालुक्याचे नेते राहिले असते. आगामी निवडणुकीत पाहूच. माझ्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय अजित पवार आणि जयंत पाटील यांचे भाषण पूर्ण होत नाही. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे, याबद्दल तुम्ही काय बोलला होता हे जाहीररित्या सांगायची वेळ आणू नका.’

कार्यकर्ता मेळाव्यासाठी आमदार जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचा:

काय म्हणाले होते अजित पवार?

‘मी चंद्रकांत पाटील यांच्या नावाचे संक्षिप्त रूप ‘चंपा’ असे केले होते. ते आता राज्यभर पसरले आहे. ‘चंपा’चे शरद पवार यांच्याबद्दलचे वक्तव्य म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’, असेच म्हणावे लागेल. ‘चंपा’ सध्या सध्या काहीही बरळायला लागले आहेत. पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे आणि देश पातळीवर निर्णय घेतानाही त्यांच्याशी चर्चा केली जात असते. म्हणूनच ‘चंपा’चे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्याचाच प्रकार आहे’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली होती.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here