मुंबई: ‘लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन महाराष्ट्रातील सरकारला हादरे देऊ, या भ्रमातून भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे,’ असा इशारा शिवसेनेनं भाजपला दिला आहे. (Shiv Sena targets BJP over Law)

‘लव्ह जिहाद’ची चर्चा सध्या देशात नव्यानं सुरू झाली आहे. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश सरकारनं या संदर्भात कायदे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनंही ‘लव्ह जिहाद’चा कायदा करावा, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात , राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचं सरकार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे सेक्युलर पक्ष म्हणून ओळखले जातात. ते अशा कायद्याला पाठिंबा देणार नाहीत हे माहीत असल्यानं शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजप ही मागणी करत असल्याचं बोललं जातंय.

वाचा:

शिवसेनेनं ‘सामना’च्या (Saamana) आजच्या अग्रलेखातून ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची मागणी करणाऱ्यावर टीकेची झोड उठवली आहे. ‘भाजपला हिंदुत्वाचा घोर लागून राहिला आहे. लव्ह जिहाद हे त्यांचे नवीन हत्यार आहे. प. बंगाल निवडणुकांनंतर ते हत्यारही भंगारात जाईल. आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरयाणा या भाजपशासित राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण कायद्यापेक्षा या प्रश्नी बोंबलण्याचीच उकळ जास्त फुटली आहे,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

वाचा:

‘भाजपच्या व्याख्येनुसार महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची कधी व किती प्रकरणं घडली आहेत, ते समोर आणावं. उगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करू नये. लव्ह जिहाद हा विषय शिवरायांच्या महाराष्ट्रात रुजू शकत नाही. येथे शिवसेनेचा हिंदुत्ववाद कायम आहे. आमचे हिंदुत्व म्हणजे खोमेनी छाप धार्मिक उन्माद व त्यावर तरारलेले राजकारण नाही,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘हा लव्ह जिहाद नाही का?’

कश्मिरात पाकनिष्ठ, ३७० कलमप्रेमी मेहबुबा मुफ्तींशी भाजपने सत्तेचा निकाह लावला हा सुद्धा वैचारिक लव्ह जिहादचाच प्रकार का मानू नये? संघमुक्त, मोदीमुक्त भारताचा डंका पिटणाऱ्या (Nitish Kumar) यांना पुन्हा कडेवर घेऊन सत्तेचा निकाह लावला हा सुद्धा लव्ह जिहादचाच प्रकार का मानू नये?,’ असे प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केले आहेत.

अग्रलेखातील इतर ठळक मुद्दे:

हिंदुत्वाचे रक्षण सर्वच पातळ्यांवर होणे गरजेचे आहे. फक्त ‘रोटी-बेटी’ व्यवहारापुरते व निवडणुकांपुरते ते नसावे. एका राज्यात गोमांस विक्रीला बंदी आणायची आणि त्याच वेळी गोवा किंवा ईशान्येकडील भाजपशासित राज्यांत गोमांसाची खुली विक्री, व्यापार करायचे. ही अशी हिंदुत्व रक्षणाची प्रतारणा लव्ह जिहादच्या बाबतीत होऊ नये, हे महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

लव्ह जिहादचे प्रकार पाकिस्तान आणि बांगलादेशात होतात. हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण करून निकाह लावले जातात. त्यामुळं ‘लव्ह जिहाद’विरोधात तिथं शस्त्र उचलण्याची गरज आहे. केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश सरकारला दम नक्कीच भरता येईल. ‘लव्ह जिहाद’चे कंबरडे मोडायचेच असेल तर मुळावर घाव घाला. म्हणजे भारतात राज्याराज्यांत आंदोलने, कायदे वगैरे करण्याची वेळ येणार नाही.

वाचा:

बिहारमध्ये भाजपचं राज्य आहे व नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांचा अनुभव मोठा आहे. बिहारात लव्ह जिहादविरोधी कायदा भाजप करणार असेल तर त्याच कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वे महाराष्ट्र सरकारला अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. एखाद्या विषयाचे वैचारिक नेतृत्व करण्याची संधी बिहारलाही मिळू द्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here