म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राज्यात लॉकडाउनच्या काळातील वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावरून भाजपला आंदोलन करण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही. तत्कालीन यांच्या राजवटीत मोठ्या प्रमाणात वीज बिलांची थकबाकी वाढलेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी सोमवारी केली. तसेच सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत की अजित पवार आहेत, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला आहे.

महावितरणमार्फत देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देऊ, असे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. त्याबाबतचा प्रस्ताव वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला होता. तथापि, तो प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांनी दाबून ठेवला आहे, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. यामुळे राज्य नेमके कोण चालवते असा प्रश्न निर्माण झाला आहे असे ते म्हणाले. सरकारने ग्राहकांना वीज बिलात सवलत द्यावी अन्यथा सर्वसामान्यांनी वीज बील भरता कामा नये. वीज मंडळाने खंडित केल्यास आम्ही ग्राहकांच्या वीज जोडण्या पूर्ववत करून देऊ, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे विरोधकांच्या अजेंड्यावर चालणारे सरकार आहे. सध्या विरोधक मागणी करतात मग त्या मागणीचा पाठपुरावा सरकार करते, असे आंबेडकर यांचे म्हणणे आहे. वीज बिल माफीसंदर्भात उर्जामंत्र्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here