करोना संसर्गाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील स्थितीची सर्वंकष माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांपुढे ठेवली. तसंच, करोना लसीबाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती पंतप्रधानांना दिली आहे.
‘कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे,’ अशी माहिती ठाकरेंनी दिली आहे.
दरम्यान, राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट येऊ नये म्हणून राज्य सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी करोना चाचणीचे प्रमाणपत्रक बंधनकारक असणार आहे. जर, प्रवाशांकडे करोना चाचणीचे अहवाल नसतील तर त्यांची तिथेच करोना चाचणी होणार असून जर अहवाल निगेटिव्ह आल्यास राज्यात येण्याची परवानगी मिळणार आहे. अन्यथा या प्रवाशांना परत माघारी फिरावे लागणार आहे.
वाचाः
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times