‘ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांच्याकडून होणाऱ्या कारवाईमध्ये केंद्राचा कोणताही हात नसतो. त्यामुळे शिवसेनेचे आमदार यांच्यावर जो इडीचा छापा पडला त्यात भाजपचा कोणताही हात नसल्याचा खुलासाही पाटील यांनी केला. इडीच्या कारवाईबाबत आरोप करणे म्हणजे विरोधकांना संविधान अमान्य असल्याचा,’ आरोपही त्यांनी केला.
राज्यात सध्या महिला मुख्यमंत्री या संदर्भात जी चर्चा सुरू आहे त्याबाबत विचारले असता ते म्हणाले,उद्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आलीच तर शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील. जेव्हा उपमुख्यमंत्री करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी जयंत पाटील यांच्या ऐवजी अजित पवार यांची निवड केली. बंडखोरी केली असतानाही तिकडे दुर्लक्ष केले, यावरून पुढील राजकीय हालचाली स्पष्ट होतात,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
‘पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित आहे याची खात्री विरोधकांना झाल्यामुळेच ते पराभवाचे कारण आत्ताच शोधत आहेत त्यातूनच मतदार नोंदणीबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू करण्यात आल्याचा,’ टोलाही पाटील यांनी मारला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times