म. टा. प्रतिनिधी, : हुंड्यासाठी विवाहितेला वारंवार मारहाण करुन जिवंत पेटवून देत तिचा खून करणाऱ्या पतीला व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्याचे आदेश प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. टेकाळे यांनी सोमवारी दिले. अशोक अण्णा मोरे (३५, रा. गुरुदत्‍त नगर, गारखेडा परिसर) असे नराधम पतीचे नाव आहे.

या प्रकरणात मृत मनिषा अशोक मोरे (२५) हिने फिर्याद दिली होती. २०१२मध्ये मनिषाचे लग्‍न आरोपी अशोक मोरे याच्याशी झाले होते. त्यांना दोन मुली आहेत. लग्‍नानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर नवरा आणि सासू नर्मदाबाई मोरे (६०) यांनी मनिषाला लग्‍नात हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून वारंवार शिवीगाळ व मारहाण करून छळ करीत होते. २४ जानेवारी २०१६ रोजी याचा कारणावरून मनिषाला बेदम मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी आरोपी अशोक हा सायंकाळी दारू पिऊन आला. त्यामुळे मनिषाने त्याला दारू पिण्याचा जाब विचारला. त्यामुळे चिडलेल्या अशोकने मनिषाला शिवीगाळ, मारहाण करीत घरातील रॉकेलने भरलेली कॅन तिच्या अंगावर ओतून पेटवून दिले. मनिषाने आरडाओरडा केल्याने आरोपीने तिच्या अंगावर वाळू टाकून आग विझविली. मनिषाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २६ जानेवारी २०१६ रोजी पोलिस आणि नायब तहसिलदारांनी मनिषाचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविला. त्यानुसार, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात ३०७, ४९८ (अ) व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारा सुरू असताना ३१ जानेवारी २०१६ रोजी मनिषाचा मृत्यू झाला. त्यानंतर गुन्ह्यात कलम ३०२ वाढविण्यात आले.

पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान अतिरिक्‍त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात नायब तहसिलदार, मृत मनिषाचे वडील आणि मृत्यूपूर्व जबाब महत्त्वाचा ठरला. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी अशोक मोरे याला कलम ३०२ अन्वये जन्मठेप, दोन हजार रुपये दंड, कलम ३२३ अन्वये सहा महिने सक्‍त मजुरी, ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. गुन्ह्यात तत्कालीन पोलिस निरीक्षक ए. डी. जारवाल यांनी तपास अधिकारी म्हणून तर, पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार भानुदास कोलते यांनी काम पाहिले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here