मुंबई: शिवसेनेचे आमदार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ईडीने कारवाई नेमकी का केली? याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापे मारले आहेत. मुंबई आणि ठाण्यातील ठिकाणांवर झाडाझडती घेतली जात आहे. प्रामुख्याने बांधकाम क्षेत्र व निवासी संकुलांशी संबंधित विविध प्रकल्पांत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. प्रताप सरनाईक यांचा मोठा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहेत. दरम्यान, प्रताप सरनाईक हे मुंबईबाहेर असल्यानं त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नव्हती. त्यानंतर सुमारे ८ तासांनी त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

प्रताप सरनाईक मुंबईत येताच त्यांनी संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली, तिथं त्यांच्यात सुमारे १ तास चर्चा झाल्याचं समजतंय. त्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया देताना त्यांनी ईडीने आम्हाला का बोलावलं आहे? ही सगळी कारवाई नेमकी का केली? तसंच, या विरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं, त्यांनी सांगितलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here